चालू घडामोडी

😔काय माझा गुन्हा 😞

                                    😔काय  माझा गुन्हा 😞

सांग ना रे  देवा मला
काय केला रे मी गुन्हा,
म्हणून  तू देत आहेस
याची शिक्षा मलाच पुन्हा....

                                                                         आयुष्यात   मी ही केले
मनापासून तुझ्यावर प्रेम,
नाही   आलं   कधी मनी
नियतीच करील असा गेम...

लावला होता तू ही मला
जीव अगदी मनापासून,
फुलण्या आधी  रे कळी
घालवावी का  कुस्करून....

माझ्या  असाह्यपणाचा का
नराधमानी घ्यावा  फायदा,
पैसे  फेकून  केस  जिंकती
असा कसा रे जगाचा कायदा...

सांग देवा तूच मला आता मी
जगू तरी  कसं नि कुणासाठी,
प्रियकर  गेला  केव्हाच  सोडुनी
ना बांधिना कुणी रेशीम गाठी...

सुखी संसाराची  स्वप्ने माझी
डोळ्यादेखत धुळीला मिळाली,
चूक नसताना ना माझी काहीच
का ? मला  जीवंत  रे  जाळली...

अरे नराधमांनो  जरा  तुम्ही
सरळ चांगल्या नजरेने वागा,
पर स्त्री ला माना माताभगिनी
आपुलकीने तिच्याशी वागा....

©®©
✍ अभिजित आ पाटील
संस्थापक काव्यसमर्पण
📞 ८८८८१९१७१४
दि. २०/०४/२०१६

No comments