चालू घडामोडी

काव्य समर्पण जुलै ई मासिक अंक २०१९



रसिकश्रोते हो नमस्कार !
‘काव्यसमर्पण-स्वप्नाचे व्यासपीठ’चा हा दुसरा ई-अंक मासिक जुलै-२०१९ आपल्यासमोर सादर करताना आज आम्हाला अत्यानंद होत आहे. यापूर्वी आम्ही ई-अंक मासिक जुन-२०१९  प्रकाशित केला होता. या अंकाला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे ‘काव्यसमर्पण’चा हा ई-अंकाचा दुसरा अंक आम्ही आज प्रकाशित करत आहोत.

‘काव्यसमर्पण-स्वप्नाचे व्यासपीठ’चा हा दुसरा ई-अंक मासिक जुलै-२०१९ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आमच्या जुन ई-अंकात अनेक साहित्यिकांनी भाग घेतला. अभिजित पाटील यांची ‘काय माझं गुन्हा?’, दिगंबर कोटकर यांची ‘आई’ कविता, अशोक पवार यांची ‘निरोप देताना’, सुनिल पवार यांची उष्टी फळे’ कविता त्याचबरोबर वृषाली सानप काळे यांचा ‘दिप कविता’ लेख, संगिता वेताळ यांचा ‘घरकुल’ आणि पल्लवी फडणीस यांच्या ‘mee too…’ हा लेख व इतर साहित्यिकांनी रसिकश्रोत्यांची मने जिंकली. त्यातील काही निवडक साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्ही या अंकात त्यांना प्रमाणपत्र प्रदान करत आहोत.
     नवोदित कवींचे काव्य रसिकश्रोत्यांना समर्पित करण्याचे कार्य ‘काव्यसमर्पण’ करते. कथा, कविता, लेख, चारोळी, इ. रुचकर साहित्य रसिकांना या अंकात पाहायला मिळणार आहे. जगभरात ई-माध्यमातून साहित्य रसिकांपर्यंत पोहोचण्यात आपल्या सर्वांची मोलाची भूमिका आहे. सर्व सहभागी कवी, कवियित्री, लेखक, लेखिका यांचे मनस्वी आभार. काव्यसमर्पणचे सर्व संचालक व सभासद यांचा यात मोलाचा वाटा आहे. ज्ञात व अज्ञात सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
     आपला पाठींबा, प्रोत्साहन व सक्रीय सहभाग हा या ‘काव्यसमर्पण’ चा केंद्रबिंदू ठरतोच. आपल्या शुभाशिर्वादाने याच संस्थेच्या माध्यमातून साहित्य रसिकांची सेवा घडणार आहे.
     आपल्या प्रतिक्रिया व मार्गदर्शनाची आम्हांस प्रतिक्षा आहे.
संपादक :
धनराज होवाळ

No comments