😢ब्रिटिश पूल 😢
ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलाची
ते आजपण काळजी घेतात
पूल धोकादायक झाला आहे
असा पत्र लिहून पाठवतात
पुरात अनेकांचा जीव जातो
सरकारला येते जाग
सगळे पक्ष कॅमेरा समोर
एकमेकांवर काढतात राग
जोपर्यंत पूल नाही पडत
सरकार निपचिप असते
मग ऑडिट करण्यात
मग्न असल्याचं दिसते
पुरात गेलेल्या सर्वांना
निधी जाहीर होतो
सरकारी अधिकारी हिस्सा
निधीतला पण घेतो.
अभिजित विनवतो
तुम्हा जोडुनी हात
घ्या काळजी पुलाची
नको वरवरची बात
✍अभिजित आ पाटील
📞 ८८८८१९१७१४
दि. ०५|०८|२०१६
वेळ. सकाळी ८ वा २८ मि.
No comments