🙎🏻 करिअर 🙎🏻
🙎🏻 करिअर 🙎🏻
आई म्हणते पोरीला
तू आधी करिअर कर ||धृ||
नाही धुतलीस भांडी ,
नाही जमली जरी भाकरं,
तू फक्त अभ्यासचं कर,
घरी ठेवू कामाला चाकर ||१||
नको सासू सासरे,
नको गावाकडच घर,
दोघांचा टुमदार बंगला,
हाताखाली कामाला नोकर ||२||
कमवतीस फक्त पैसा ,
लोक उडवतील तुझी टर,
पैश्याच्या जीवावर त्यांना तू,
लाव जोडायला दोन्ही कर ||३||
लठ्ठ पगाराची नोकरी ,
असलेलाचं बघ तू वर,
दोघे ही मिळवा अमाप पैसा,
आणखी होईल भरीत भर ||४||
महिलांना आहे आरक्षण,
मानु नकोस तू कधी हार,
अबला समजून तुझ्यावर
करतील समाजकंटक वार ||५||
एवढे होऊन ही कधी तू
विसरु नको तू मातृत्वाला,
पेटवं मशाल क्रांतीची
टिकविण्या स्री अस्तित्वाला ||६||
©®©
✍अभिजित आ पाटील
संस्थापक काव्यसमर्पण
📞 ८८८८१९१७१४
(तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा,आवडल्यास नावासाहित पुढे पाठवा)
आई म्हणते पोरीला
तू आधी करिअर कर ||धृ||
नाही धुतलीस भांडी ,
नाही जमली जरी भाकरं,
तू फक्त अभ्यासचं कर,
घरी ठेवू कामाला चाकर ||१||
नको सासू सासरे,
नको गावाकडच घर,
दोघांचा टुमदार बंगला,
हाताखाली कामाला नोकर ||२||
कमवतीस फक्त पैसा ,
लोक उडवतील तुझी टर,
पैश्याच्या जीवावर त्यांना तू,
लाव जोडायला दोन्ही कर ||३||
लठ्ठ पगाराची नोकरी ,
असलेलाचं बघ तू वर,
दोघे ही मिळवा अमाप पैसा,
आणखी होईल भरीत भर ||४||
महिलांना आहे आरक्षण,
मानु नकोस तू कधी हार,
अबला समजून तुझ्यावर
करतील समाजकंटक वार ||५||
एवढे होऊन ही कधी तू
विसरु नको तू मातृत्वाला,
पेटवं मशाल क्रांतीची
टिकविण्या स्री अस्तित्वाला ||६||
©®©
✍अभिजित आ पाटील
संस्थापक काव्यसमर्पण
📞 ८८८८१९१७१४
(तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा,आवडल्यास नावासाहित पुढे पाठवा)
No comments