चालू घडामोडी

😢 आई 😢

आई हिरावून नेलेल्या   मुलाची व्यथा माझ्या  कवितेतून  मांडतो आहे..

😢    आई   😢

आई आयुष्यातून जेव्हा
घेतलीस माझ्या तू रजा
न हाती  शिल्लक उरले
तुज अस्तित्व करता वजा...

नऊ महिने उराशी
तू बाळगल गं मला
आयुष्य जगण्याची
तूच शिकवलीस कला...

सुखी ठेवण्या तान्हुल्याला
आई अहोरात्र कष्ट तू केलं
सुखाचे  आले  दिन आणिक
तुला  दैवान  हिरावुन  नेलं...

तुझ्या मायेची सर आई
जगी  कशालाच गं नाय,
जिंकलो सगळ्या  स्थळी
पण येथे साफ़ हरलो माय..

तू दिलेल्या विचारावर
इथून  पुढे  मी चालेल
तुला दिलेल्या वचनांना
नेहमीच  साद  घालेल...

©®©
✍ अभिजित आ पाटील
संस्थापक काव्यसमर्पण
📞८८८८१९१७१४
दि.०६|०५|२०१६
वेळ रात्री ११:४५ मि.

No comments